श्वेता सतीश सामंत हिचा सीए परीक्षेत यश मिळविल्या बद्दल युवासेने मार्फत सत्कार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

नुकत्याच झालेल्या (ICAI) institute of charted account ) म्हणजे सी ए च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होत पदवी मिळविल्या बद्दल कणकवली शहरातील मधलीवाडी येथील श्वेता सतीश सामंत हिचा युवा सेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांनी तिच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी युवासेना समन्वयक तेजस राणे, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी व तिची आई स्नेहा सामंत आदी उपस्थित होते. खचून न जाता श्वेता हीने जिद्द व कसोटी बाळगत अभ्यास करून या परीक्षेमध्ये यश मिळवले. याबद्दल सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!