दिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर

आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर दिविजा वृद्धाश्रमात साकार केले. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकारी वेशभूषा परिधान केली. यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानदेव, सोपान, निवृत्तीनाथ व मुक्ताई यांचा पेहराव केला तर इतर आजी आजोबांनी वारकरी पेहराव घातल्यामुळे आश्रमातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रविवारी दिवसभर आश्रमात भक्तिमय वातावरण होते.

ढोल ताशाच्या तालावर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पारंपारिक पद्धतीने पूजा अर्चा केली गेली. आश्रमाचे खजिनदार अविनाश फाटक यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून आरती केली. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांची वारीची ओढ पाहून दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवघा पंढरपूरच दिविजा वृद्धाश्रमात अवतरला. वयोमानामुळे थकलेल्या आजी आजोबांना आनंदाचे क्षण जगता यावे यासाठी सौं मैथिली फाटक यांनी आपल्या शाळेतील (ओशिवरा माणिकजी मनपा शाळा) सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन पंढरपूर वारीचे सुंदर पथनाट्य सादर केले. या पथनाट्यामुळे आजी आजोबा भारावून गेले.

आश्रमातील आजींनी नऊवारी साड्या तर आजोबांनी धोतर, सदरे लेंगे व टोप्या,गळ्यात तुळशी माळा,कपाळी कस्तुरी टिळा लावून या कार्यक्रमाला आगळी वेगळी शोभा आणली होती तर आश्रमातील महिला कर्मचाऱ्यांनी या रंगलेल्या कार्यक्रमास भजनाची जोड देऊन सुंदर असा आवाज आश्रमात चालवला होता. तर आश्रमातील तरुण तडपदार ऑफिस कर्मचाऱ्यांनी लेझीम च्या तालावर आजी आजोबांना व पाहुण्यांना नाचवले. मनपा शाळेतील शिक्षक पद्माकर सावे यांनी वासुदेवाची भूमिका साकारून वासुदेव आला रे वासुदेव आला या गाण्यावर सुंदर नृत्य करून दाखवले याच कार्यक्रमात फोंडा शाळेतील शिक्षक दत्तगुरू चव्हाण यांना आजी आजोबांनी वाचलेली १०० पुस्तके शालेय विद्यार्थांना वाचनालयासाठी भेट देण्यात आली.

यानंतर दिंडीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. आश्रमातील आजी आजोबा कर्मचारी वर्ग,ट्रस्टी,मुंबई वरून आलेले पाहुणे समस्त ग्रामस्थ सर्वांनी मिळून वारीला सुरुवात झाली. ढोल आणि लेझीम च्या तालावर आश्रमातून दिंडी निघाली.पाई हळू हळू चाला मुखाने पांडुरंग बोला असा जल्लोष करत आश्रमातील समस्त कार्यकारी डोक्यावर तुळशी,विठ्ठल रुक्मिणी मूर्ती,झांजा,लेझीम ढोल ताशांच्या उस्ताहत दिंडी चालत होती.असा हा अनोखा दिंडी सोहळा आषाढी एकादशी दिवशी दिविजा वृद्धाश्रमात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा केला गेला.

दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी या कार्याबद्दल बोलताना असे सांगितले कि कौटुंबिक प्रवाहातून आजी आजोबा बाहेर निघाले आहेत,आयुष्याच्या या सांजवेळेतून कौटुंबिक कलातून दिविजा वृद्धाश्रमात आपले नविन कौटुंबिक जीवन आनंदात उत्साहात जगत आहेत आणि हे जीवन जगत असताना पांडुरंगाला भेटण्याची ओढ त्याच्या जीवाला लागली आहे परंतु शारीरिक व्याधी व थकलेल्या शरीरामुळे उतार वयात पंढरपूर वारी सोबत जाणे शक्य होत नाही.अशा या आजी आजोबांना पंढरपुरात जाऊन विठ्ठलाची भेट व्हावी व दिंडीचा आनंद लुटता यावा या उद्देशाने आश्रमातच प्रति पंढरपूर उभे केले जाते .पंढरपुरचा आनंद दिविजा वृद्धाश्रमातच घेता यावा व वारीचा आनंद मिळावा या उद्देशाने आषाढी एकादशीचा कार्यक्रम दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला जातो.

यावेळी आलेल्या पाहुण्यांमध्ये उद्योगपती श्री व सौ परिणीता उल्हास फाटक यांनी आश्रमास भेट दिली व दिंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी केले व त्या कार्यक्रमाचे नियोजन कु अश्विनी पटकारे, कु सायली तांबे, सौ अस्मि राणे, सौ अमृता इंदप, कु ऋतुजा इंदप, श्री समीर मिठबावकर यांनी केले तर पंढरपूरचा देखावा उभा करण्याचे काम आश्रमातील पुरुष कर्मचारी श्री सखाराम कोकरे, श्री महादेव हुंबे, श्री सुनील इंदप, श्री प्रवीण डामरे यांनी केले. आजी आजोबांसाठी महाप्रसादाचे काम सौ मंजिरी राणे, अनुजा आचरेकर, सौ प्रतीक्षा सावंत, सौ सायली इंदप, सौ सारिका सावंत, श्रीं भारती गुरव, श्रीं प्रमिला शेलार, सौ सानिया इंदप यांनी केले.तर मुंबईहून आश्रमातील ट्रस्टी सौ साधना तेलतुंबडे,श्रीं संध्या गायकवाड,श्री संजय ढवण,श्री किरण नारायणकर,सौ अमृता थळी,सौ सुजाता हादगे,श्री पद्माकर सावे,श्री व सौ जयश्री दिनकर कांबळे,श्री व सौ वंदना विनोद जाधव,सौ सुगंधा देवरुखकर,श्रीं सुलभा पाटील,श्रीम पाखरे,श्रीम क्षमा कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!