विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन

यानिमित्ताने जानवली येथे वृक्षारोपणाचा उपक्रम
विश्व हिंदू परिषदे अंतर्गत बजरंग दलाच्या मार्फत सेवा सप्ताह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असून या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील जानवली मारुती मंदिर या प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. असून याप्रसंगी बजरंगदल रत्नागिरी सिंधुदुर्ग विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, तालुका संयोजक नागेश मोगवीरा, अभि राणे, अमोल रासम, अमित मयेकर,
शुभम तावडे, शंकर जंगम, निकेतन राणे, विश्व हिंदू परिषद चे सुनील सावंत, नंदकुमार आरोलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे किशोर दाभोलकर प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, व शिक्षक प्रदीप मांजरेकर आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आधी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली