कणकवलीतील महामार्गाचे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवण्यास सुरुवात

कार्यकारी अभियंत्यांनी काही दिवसापूर्वी दिली होती ग्वाही
गणेश चतुर्थी पूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याची केली जाते मागणी
कणकवली शहरासह महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे बुजवण्याचे काम पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून महामार्ग प्राधिकरण कडून हाती घेण्यात आले आहे. कणकवली शहरात गांगो मंदिर सह काही भागांमध्ये फ्लाय ओव्हर ब्रिजच्या खाली सर्विस रस्त्याला पडलेले खड्डे गेले दोन दिवस बुजविण्यात येत असून, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी खड्डे खोदाई करून हे खड्डे बुजवले जात आहेत. गांगो मंदिर जवळ अंडरपास समोर पडलेला भला मोठा खड्डा हा काल पेव्हर ब्लॉकने बुजवण्यात आला. मात्र शहरात आता स्टेट बँके. समोर पासून अनेक ठिकाणी अजून खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून हे खड्डे मोठे स्वरूप घेण्याच्या अगोदरच बुजवले जावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान महामार्ग प्राधिकरन च्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी काही दिवसांपूर्वी हे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवून महामार्ग खड्डे मुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रत्यक्षात कार्यवाही झाली असून आता महिन्याभरानंतर गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात मोठा सण येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच महामार्गाला पडलेले खड्डे दूर करून महामार्ग खड्डेमुक्त करावा अशी मागणी जनतेतून समोर येत आहे.