न्यू इंग्लिश स्कूल आचरा चा गुणगौरव सोहळा संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी समिती सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,तंत्र व विकास केंद्राचे रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,जाधव,यांसह अन्य शिक्षक,पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच स्थानिक स्कूल समितीच्या आर्थिक सहभागातून पाचवीच्या विद्यार्थ्यांचा गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या औचित्यावरखातिजाबी काझी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई पुरस्कृत शालेय मुलांना 50 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले.