शिक्षक भारती कणकवलीचा मदतीचा हात

हरकुळ खुर्द मधील भावांना संघटनेच्या वतीने दिला आधार
जि. प. शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेत शिकणाऱ्या मनोहर शरद खानविलकर या विद्यार्थ्याच्या वडीलांचा २०२४ मध्ये मृत्यू झाला आणि यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये त्याच्या आईचेही निधन झाले आहे.
मनोहर ला २ बहिणी व १ भाऊ आहे. या चारही भावंडांसमोर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई वडिलांचे छत्र हरपल्याने पोरकी झाल्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यांच्या उदरनिर्वाह व शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चासाठी मदतीचा हात म्हणून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून शिक्षक भारती कणकवलीच्या संघटनेच्या वतीने आज दि. २० मार्च २०२६ रोजी रु. २७,०००/- चा धनादेश देत मदत निधी संबंधित मुलांजवळ सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा सरचिटणीस गिल्बर्ट फर्नांडीस, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिलीप धामापूरकर, रामचंद्र सातवसे, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र पवार, सचिव संजय कोळी, कार्याध्यक्ष दिलीप शेळके, कोषाध्यक्ष संदिप तांबे, तालुका संघटक प्रकाश बुचडे, अजित कदम, राजाराम भिसे, अंतर्गत हिशेब तपासणीस महेश चव्हाण, केंद्रसंघटक नितीन सातवसे आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते.





