कातकरी युवकावर कोयत्याने हल्ला

कणकवली मधील घटना
कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कातकरी युवकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यात कातकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले परंतु याची पोलिसात तक्रार दाखल नाही.
याबाबत उपलब्ध माहिती नुसार तो युवक बाजारपेठेतून पटकीदेवी मंदिर मार्गे बांधकरवाडीच्या दिशेने जात असताना कातकरी युवकाचा आणि त्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांचा वाद झाला. यात कातकरी युवकच्या हातात असलेला कोयता घेऊन त्याच्यावर डोक्यावर तीन ते चार ठिकाणी सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न संशयिता कडून करण्यात आला आहे. या हल्ल्ल्यात कातकरी समाजातील युवक गंभीर जखमी झाला. स्थानिकांना त्याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.





