पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.मिलिंद देसाई यांचा कनेडी पंचक्रोशीतील सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार.

कणकवली/प्रतिनिधी
कणकवली पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल मा.श्री मिलिंद देसाई हे कनेडी बीट येथे काही वर्ष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते.कणकवली पोलीस स्टेशनअंतर्गत कार्यरत असणारे हेड कॉन्स्टेबल श्री.मिलिंद देसाई यांची बदली नुकतीच खारेपाटण येथे झाली असून त्यांनी कनेडी बीटचा कार्यभार सोडला.गेल्या काही वर्षांपासून कनेडी परिसरात त्यांनी जो सेवा भाव जपला,तो स्थानिक पोलीस पाटील,नागरिक आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या मनात कायमचा घर करून गेला आहे.
त्यांचा स्वभाव हा अत्यंत कठोर-मनमिळावू,संयमी आणि प्रसंगी मार्गदर्शकासारखा होता.प्रत्येक पोलीस पाटील यांच्याशी त्यांनी घनिष्ट आणि विश्वासार्ह नाते निर्माण केले.त्यांच्या वागणुकीत एक आपुलकी होती,जी त्यांना सर्वांमध्ये वेगळं स्थान मिळवून देत होती.जेव्हा कधी हद्दीतल्या गावी कोणतीही अडचण येई तेव्हा ते सर्वप्रथम धावून येत – हे त्यांच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य होतं. त्यांची ही समर्पित वृत्ती आणि सहकार्याची भावना अनेकांमध्ये आजही जिवंत आहे.
सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने त्यांचा नुकताच कनेडी येथे सत्कार करण्यात आला.सत्कार स्वीकारत असताना हेडकॉन्स्टेबल श्री.मिलिंद देसाई हे भावनिक होताना दिसले.या कार्यक्रम प्रसंगी नव्याने चार्ज घेतलेल्या वेंगुर्लेकर साहेब यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला.