रिक्षा अपघातात मयत संकेत घाडी कुटुंबियांना सिंधुदुर्ग घाडीगांवकर समाजाकडून आर्थिक मदत

आचरा येथील रीक्षा व्यावसायिक संकेत घाडी यांच्या अपघाती निधनाबद्दल क्षत्रिय मराठा घाडी गांवकर समाज सिंधुदुर्गच्या वतीने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेत आर्थिक मदत सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत घाडी यांच्या हस्ते संकेत घाडी यांचे वडील सदानंद घाडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.तसेच समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य , पत्रकार विजय गांवकर, सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष सूर्यकांत घाडी,सचिव प्रदीप घाडी, कार्यकारीणी सदस्य बुधाजी घाडीगांवकर , सुनील गांवकर , दत्तगुरु गांवकर , अर्जुन बापर्डेकर, तसेच पोयरे माजी सरपंच संदीप घाडी,आचरा येथील समाज बांधव माजी सरपंच शामसुंदर घाडी,सौ उल्का चंद्रकांत घाडी, मध्यवर्ती
माजी ग्रामपंचायत सदस्य लवू घाडी, रामचंद्र घाडी,मंगेश घाडी,रुपेश घाडी,बाळा घाडी,महादेव घाडी,विलास घाडी,यांसह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य आदी उपस्थित होते.
आचरा येथील समाज बांधव संकेत घाडी यांचं नुकतंच दुर्दैवी अपघाती निधन झाले. रिक्षा व्यवसाय करून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते .त्यांच्या कुटुंबीयांवर उद्भवलेली आपत्कालीन स्थिती पाहता क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , सिंधुदुर्ग विभागाने तमाम घाडीगांवकर समाज बंधू- भगिनींना आपत्कालीन मदत निधीसाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले होते. याला भरघोस प्रतिसाद देत समाज बांधव भगिनींनी मदतीसाठी सहाय्य केले होते. यातून जमलेला निधी संकेत घाडी कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली तसेच वेळोवेळी सहकार्यास तत्पर असल्याची ग्वाही अध्यक्ष सुर्यकांत घाडी यांनी दिली.