तीन महिन्यांचे रेशन धान्य स्वीकारण्याचे जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

अन्यथा धान्य आवश्यक नसल्याचे गृहीत धरणार
पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य ३० जून २०२५ पूर्वीपर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करावे असे आवाहन श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच श्री विजय सहारे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
धान्याची आगाऊ उचल करताना लाभार्थ्यांनी माहे जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांचे धान्य मिळाल्याची खात्री करावी. जे लाभार्थी दिनांक ३० जून २०२५ पूर्वीपर्यंत धान्य उचल करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना धान्याची गरज नसल्याची बाब समजून त्यांच्या प्राकुला व अंत्योदय शिधापत्रिका APL केशरी मध्ये वर्ग करुन त्यांना धान्याचा लाभ घेता येणार नाही याची गंभीरपणे नोंद घेण्यात यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.