कणकवली पटवर्धन चौकात ३० जून रोजी शिवसेना करणार हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी

शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
भाजप-महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यात हिंदी सक्तीचा शासन निर्णय काढला असून त्याद्वारे महाराष्ट्रातील मराठी भाषेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवार दि. ३० जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली पटवर्धन चौकात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत
तरी यावेळी कणकवली तालुक्यातील शिवसेना, महिला, युवासेना, शिवसेना संलग्न संघटनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी तसेच सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैय्या पारकर आणि प्रथमेश सावंत यांनी केले आहे.