परिट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे

दिलीप भालेकर यांचे आवाहन : परिट समाज संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

परिट समाजाच्या उन्नती व उत्कषार्साठी समाजबांधवांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. परिट समाजाला एकसंध करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज परिट समाज संघ, सिंधुदुर्गने पुढाकार घेतला आहे. परिट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे नाव रोशन करावे. परीक्षांमध्ये अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा यश संपादन करण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करावी, असे आवाहन संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले.
श्री संत गाडगे महाराज परिट समाज संघाच्यावतीने प.पू.भालचंद्र महाराज संस्थानाच्या भक्तनिवास सभागृहात समाजातील दहावी, बारावी, पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. भालेकर बोलत होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनश्री चव्हाण, सचिव अनिल शिवडावकर, कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र करंजेकर, उपाध्यक्ष विलास चव्हाण कणकवली तालुका महिला अध्यक्षा मनाली चव्हाण, राजू भालेकर,प्रदीप नारकर,दीपाली भालेकर विलास साळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भालेकर म्हणाले, परिट समाजाचा कोकण विभागीय मेळावा घेण्याचा शब्द मी राज्य संघटनेला दिला होता. समाजबांधवांच्या विश्वासावर हा शब्द मी दिला. त्यानुसार ४ मे रोजी कुडाळ येथे समाजाचा मेळावा घेतला. हा मेळावा समाजबांधवांनी केलेल्या सहकायार्मुळे यशस्वी झाला. परिट समाजाचे संत गाडगे महाराज हे दैवत आहे. त्यांची जयंती व पुण्यतिथी परिट संघ साजरी करीत आहे. संत गाडगे महाराज यांची जयंती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी प्रत्येक तालुक्यात साजरी करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. संघाचे रजिस्टेशन करण्याची प्रक्रिया सुरू असून यापुढील काळात संघातर्फे समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परिट समाजातील विद्यार्थ्यांनी परीक्षांचे यश संपादन केले आहे. त्यांचा गुणगौरव करण्याचा निर्णय संत गाडगे महाराज परिट संघाने घेतला आहे.त्यानुसार तालुकानिहाय गुणगौरव सोहळा आयोजित करून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत असल्याचे दिपाली भालेकर यांनी सांगितले. समाजाच्या उन्नती व उत्कषार्साठी समाजबांधवांना एकत्रित करण्याचे काम संत गाडगे महाराज परिट संघातर्फे सुरू झाले आहे. यापुढील काळात संघामार्फत शैक्षणिक, सामाजिक यासह अन्य उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे राजू भालेकर, प्रदीप नारकर, विलास साळसकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजातील दहावी, बारावी, पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू, गाडगे महाराज यांचा फोटो देत गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत शहाकार यांनी केले. तर आभार प्रसाद पालकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!