मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाचे तब्बल 34 लाख 23 हजार भाडे थकीत

इमारत मालकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

कणकवली तालुका काँग्रेसचा उपोषणाला पाठिंबा

कणकवली येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचे तब्बल 34 लाख 23 हजार रुपयांचे भाडे शासनाकडून थकीत असल्याबद्दल या इमारतीचे मालक अनिल डेगवेकर यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला कणकवलीतील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. शासनाकडून येणे असलेल्या या रकमेबाबत अनेक स्तरावर निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही केली नसल्याने अनिल डेगवेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी अनिल डेगवेकर यांच्यासह कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, पंढरीनाथ पांगम, अजय मोर्ये, प्रविण वरुणकर निलेश मालंडकर, आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / सिंधुदुर्ग

error: Content is protected !!