कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिजखाली पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई

कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिजखाली पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई

अनधिकृत पार्किंग मुळे रहदारीला अडथळा

आरटीओ व कणकवली पोलिसांची संयुक्त कारवाई

कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर आरटीओ व कणकवली पोलिसांनी मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान कारवाईसत्र राबविले. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे कारवाईसत्र राबविण्यात आले. येथील शिवाजी महाराज चौकानजीक पुलाखाली वाहने लावलेल्या वाहनधारकांनी आपापली वाहने तेथून हटवली. पालकमंत्री नितेश राणे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच शहराच्या समस्येवर आढावा बैठक घेतली होती. यात मंत्री राणे यांनी उड्डाणपुलाखाली जागेतील नेहमीच पार्किंग केलेली वाहने तात्काळ हटविण्याचे आदेश आरटीओ व पोलिसांना दिले होते. त्यानंतर आरटीओ व  कणकवली पोलिसांनी शनिवारी कारवाईसत्र राबविले होते.त्यावेळी वाहन चालकांनी उड्डाणपुलाखाली पार्क केलेली वाहने स्वत:हून हलवली होती. मात्र हेच कारवाईसत्र पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे आरटीओ व पोलासांकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी हे कारवाईसत्र राबविण्यात आले.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!