न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे उत्साहात स्वागत

न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवेश करणा-या मुलांवर पुष्पवर्षाव करत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रवेश दारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
या कार्यक्रमाला स्थानिक स्कूल समिती सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, प्रकाश महाभोज, मधुरा माणगांवकर,यांसह इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वपुस्तकांचे वाटप करण्यात आले.