आयडियल प्रशालेत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा.

वरवडे ग्रामपंचायतीला दिली विद्यार्थ्यांनी विविध रोपे भेट.

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.या दिनाच्या निमित्ताने शालेय आवारात विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले.तसेच वरवडे ग्रामपंचायत येथे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन एक पर्यावरण संरक्षण आधारित नाटिका सादर करून ग्रामपंचायतीला काही रोपे भेट दिली.
आजच्या घडीला हवामान बदल, प्रदूषण,जैवविविधतेचा नाश यासारख्या गंभीर समस्यांशी आपण सामना करत आहोत.जागतिक पर्यावरण दिन हे या समस्यांबाबत जागृती करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे.निसर्गाचे रक्षण करणे म्हणजे पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी आजच पाऊल उचलणे आहे.
या कार्यक्रमाला आयडीयलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,सचिव श्री.हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सहसचिव श्री.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी. तानावडे यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!