आचरा येथे गुरुवारी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा

आचरा : गुरुवारी २३ मार्च २०२३ रोजी म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराज गृहमठ आचरा ( सुनील खरात यांच्या निवासस्थानी) पटेल स्वामिल नजिक, कणकवली रोड, आचरा येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
सकाळी 5.45 वाजता –
श्रींना दुग्धाभिषेक
सकाळी 7 वाजता – नित्य आरती
सकाळी 9 वाजता – महाभिषेक
दुपारी 12 वाजता – महा आरती
दुपारी 1 वाजता – महाप्रसाद
सायंकाळी 7 वाजता – नित्य आरती- आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. ज्यांना अन्नदान सेवेसाठी मदत करायची असेल त्यांनी –
9404 933 733 या नंबर ला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जुन बापर्डेकर / कोकण नाऊ / आचरा