चिंदर येथे घरावर झाड पडून नुकसान आचरा येथे विजेच्या धक्क्याने गाय मृत

मुसळधार पावसामुळे आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे.शुक्रवारी मुसळधार पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे चिंदर देवूळवाडी येथील फावस्तीन मायकल लोबो यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४८०००हजाराचे नुकसान झाले.तर चिंदर बाजार येथील प्राची परशुराम माने ह्यांच्या अंगणातील मंडपावर रताब्यांचे झाड पडून पत्रे फुटून नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर ,चिंदर तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विजेच्या तारांचा शाॅक लागून गाय मृत शनिवारी आचरा पारवाडी माळरान येथे गुरुनाथ विठ्ठल आपकर रा पारवाडी यांची चार महिन्याची गाभण गाय विजेच्या तारा तुटून शॉक लागून मयत झाली. यामुळे आपकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!