कणकवली शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होणार

कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती

कणकवली शहरातील बाजारपेठ भागातील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा सार्वजनिक/खाजगी जागेत कचरा फेकता किंवा ठेवता कामा नये. स्वत:च्या जागेत ठेवावयाचा आहे. सदर कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याकरिता नगरपंचायतीने दोन भागात ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी आपणास वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. अद्याप पर्यंत आपणाकडून सूचनांचे पालन होताना दिसत नाही. सदरचा कचरा इतरत्र टाकताना दिसून येत आहे. सदरच्या कच-यामुळे सार्वजनिक ठिकाणचा परिसरात अस्वच्छ्ता दिसून येत आहे. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा आपल्या जागेतच वर्गीकरण करून ठेवण्यात यावा. असे न केल्यास कणकवली नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन उपविधी २०१७ च्या तरतूदीनुसार आपल्यावर 10 हजार ची दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात अशी माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली आहे.

error: Content is protected !!