आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल 100%

कणकवली/मयूर ठाकूर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यम प्रमाणपत्र परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल 100% लागला असून विज्ञान शाखेत विशेष श्रेणीत 11 विद्यार्थी प्रथम श्रेणी 43 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 22 विद्यार्थी तृतीय श्रेणी 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण 81 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. वाणिज्य शाखेत प्रथम श्रेणी 2 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 2 विद्यार्थी तृतीय श्रेणीत 1 विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण 5 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते *सायन्स शाखा* *प्रथम क्रमांक*- श्रावणी राजेंद्र मराठे. 526/ 600 (87.67%) *द्वितीय क्रमांक* -अनुष्का महेंद्र कुडतरकर. 498/600( 83%) *तृतीय क्रमांक* – चिन्मय मंगेश राणे, 497/600(82.83%) *वाणिज्य शाखा* *प्रथम क्रमांक -* वरूण भेराराम राठोड. 398/600,( 66.33%) *द्वितीय क्रमांक -* भावेश व्यंकटेश वारंग. 388/600,(64.67%) *तृतीय क्रमांक -* मोहंम्मद वाजीद रफिक शेख. 329/600( 54.93%)यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री डी.पी तानावडे सर,प्राचार्या सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे