खोटले गाव श्री स्वामी समर्थ नामाने दुमदुमनार

श्री क्षेत्र खोटले येथे प्रगट दिन पालखी सोहळा उत्सव
मालवण तालुक्यातील कसाल पासून 7 किमी अंतरावर श्री क्षेत्र खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन उत्सव दरवर्षी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत असतो. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खोटले गावात स्वामी समर्थ सेवेकरी फार मोठ्या प्रमानात हजेरी लावतात. पुणे, मुबई, बेळगांव, गोवा, कोल्हापूर, सांगली येथुन भविक दरवर्षी येतात. याही वर्षी श्रद्धास्थान येथे धार्मिक व सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पहाटे 5;30 काकड आरती, नित्योपासना,
सकाळी 7 वा. नामधारक सौ व श्री विजय परब हे हरिपाठ करणार आहेत
सकाळी 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी 12; 30 महाआरती, महाभोग
दुपारी 2 वा. कुंकूमार्चन
आणि दुपारी 4 वा. पालखी सोहळ
या मधील प्रमुख कार्यक्रम म्हणजे पालखी उत्सव
श्रद्धास्थान, तळेवाडी ते खोटले गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर पर्यंत परतीची पालखी परिक्रमा असते
या करिता भाविक खास करून उपस्थित राहतात, या ही वर्षी गुरुवार 23 मार्च रोजी दुपारी ठीक 4 ते 6 या वेळे मध्ये ही पालखी परिक्रमा होणार आहे. या वर्षी प्रामुख्याने
श्री रामेश्वर ढोल पथक, मुटाट देवगड
श्री रवळनाथ पारंपरिक वाद्य वृंद, खोटले
श्री जयंतीदेवी प्रा. दिंडी पथक, पळसंब ,मालवण
श्री रंगदेवता दिंडी पथक ओवळीये, मालवण
आई माऊली ढोलपथक, चेंदवन, कुडाळ
श्री गांगेश्वर दिंडी पथक हिवाळे, मालवण
श्री कलेश्वर चित्ररथ, नेरूर, कुडाळ
श्री स्वामी समर्थ दिंडी पथक, वांयगवडे ,मालवण
श्री नवलाई ढोलपथक, दाभोळे, देवगड
सखी महिला फुगडी पथक, पावशी कुडाळ
स्वराज्य महिला ढोलपथक, मालवण
हे पालखीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी पालखीला आलेल्या भाविकांना मोफत कोकम सरबत सेवा श्री महापुरुष भजन मंडळ, मधलीवाडी खोटले देणार आहेत
पालखी सोहळा नंतर 7 वाजता कौतुक सोहळा ,
संध्या.7 ;30 ते रात्री 10 महाप्रसाद
रात्री 8 ते 9:30 प्राथमिक शिक्षक कलामंच, गायक श्री राजेशजी गुरव(संगीत विशारद) यांचा भक्ती गायनाचा कार्यक्रम,
रात्री 10 वा.चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवन श्री देवेंद्र नाईक प्रस्तुत गौरी स्वयंवर हे पौराणिक नाटक होणार आहे
रात्री 2 ते पहाटे 5 :30 पर्यंत नामाचा जागर होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेणे, असे श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले यांचे कडून आवाहन करण्यात आले आहे.
मालवण / सीतराज परब