कणकवलीत श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी

प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. श्री बसवेश्वर महाराज सोहळादेखील पार पडला.
बुधवारी भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवासात वीरशैव लिंगायत समाज्याच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळच्या सत्रात श्री.गणेश पूजा, श्री बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लिंगायत समाजातील महिलांकडून श्री बसवेश्वर यांच्या बाल मूर्तीस पाळण्यात घालून पाळणा गीत म्हणत जन्म सोहळा पार पडला. समाजबांधवांना आरती म्हणून वातावरण भक्तिमय केले. त्यांनतर श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. जन्म सोहळा पाहण्यासाठी लिंगायत समाज बांधव व नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध परीक्षा व क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शासकीय कार्यालयांतदेखील बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात श्वेता पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सिद्धी टकले यांनी द्वितीय तर प्रिया सरुडकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. श्वेता पाटील यांनी मासवडी, सिद्धी टकले यांनी चणाडाळ मॅंगो पायसम, प्रिया सरुडकर यांनी इडली ढोकळा मिस्क ही पाककृती बनवली होती. या स्पर्धेत २९ हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण म्हणून निनाद पारकर व अमित टकले यांनी काम केले. दरम्यान, कणकवली तहसीलदार कार्यालयात श्री.
बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी श्री राम बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेल पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, लिंगायत समाजबांधव उपस्थित होते.