कलमठ मध्ये ठाकरे सेनेला दणका, विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप अनंत वारंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, शाखा प्रमुख प्रणय शिर्के, बूथ प्रमुख संजय गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

हा प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.

प्रवेशकर्त्यांमध्ये संतोष मेस्त्री, नितेश मेस्त्री, भूषण पवार, ओमकार मेस्त्री, चिन्मय लाड या प्रमुख कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

या कार्यक्रमावेळी भाजपचे पदाधिकारी गोट्या सावंत, सुनील नाडकर्णी, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार,पप्पू यादव, बाबू नारकर, विजय चिंदरकर, महेश लाड आणि महेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!