सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

7 मे रोजी मंत्रालयात होणार पुरस्काराचे वितरण
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना 2018 /19 या वर्षाकरिता चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग चौथा मजला मुख्य इमारत मंत्रालय यांच्या दालनामध्ये 7 मे रोजी दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरणास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य शासनाच्या अवर सचिव पूजा उदावत यांनी अजयकुमार सर्वगोड यांना एका पत्राद्वारे केले आहे. अजयकुमार सर्वगोड यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.