कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळातर्फे उपनयन संस्कार सोहळा 2 मे रोजी

ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ तालुका कणकवलीच्या वतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातील बटूंचा उपनयन संस्कार कार्यक्रम शुक्रवार ०२ मे २०२५ रोजी फोंडाघाट येथील संस्थेच्या “पूर्णानंद भवन” येथे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच 13 जुलै 2025 रोजी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दुपारी 3 वा. देखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दत्तकुमार उर्फ सुरेश सामंत, उपाध्यक्ष विद्याधर केळुसकर यांनी केले आहे.