मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल कणकवली तालुक्यात अव्वल.

कणकवली/मयूर ठाकूर.
विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच कला,क्रीडा क्षेत्रात मुलांना घडवणारे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज, वरवडे.
विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य मैदान, अशा सर्वच पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवलेल्या आयडियल इंग्लिश स्कूल ने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक पटकवत तालुक्यात चमक दाखवलीय..
कणकवली पंचायत समिती सभागृहात नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला गटविकास अधिकारी श्री. अरुण चव्हाण सर, गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर गवस सर, विस्तार अधिकारी कैलास राऊत सर, अधीक्षक सन्माननीय चव्हाण सर, सन्माननीय सूर्यकांत वारंग सर,सौ. मांजरेकर मॅडम, केंद्रप्रमुख सौ. कविटकर मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम यांना गौरविण्यात आले.
या यशाबद्दल त्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल सर, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर, खजिनदार सौ. शितल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर यांनी मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.तसेच तालुका स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.