कोकणरत्न बुवा.विनोद चव्हाण यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अपप्रवृत्तीच्या विरोधात समस्त भजनी बुवांच्या वतीने कणकवली पोलीस ठाण्यात दिली तक्रार.

कणकवली/प्रतिनिधी

कोकणाला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे.ही संत परंपरा अविरत टिकवण्यासाठी कोकणातील भजनीबुवा भजनाच्या माध्यमातून अविरत प्रयत्न करीत असतात. त्यातीलच एक प्रसिद्ध कोकण रत्न भजनी बुवा विनोद चव्हाण.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगीत गायनाबरोबरच उत्कृष्ट प्रबोधन आणि निखळ मनोरंजन करणारे भजनी बुवा अशी त्यांची ओळख आहे. जवळपास 30 वर्ष ही भजनी सेवा ते करीत आहेत.कोकणातील पंचरत्नांपैकी एक असलेले “स्वरचिंतामणी” वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचे विनोद चव्हाण बुवा शिष्य आहेत.भजन क्षेत्रात भजन सेवा प्रामाणिक पणे करीत असताना सुद्धा विनोद चव्हाण बुवांची बदनामी करणारा मेसेज व्हाट्स ऍप च्या माध्यमातून एका व्यक्तीने केला होता. सदरील पोस्ट भजन क्षेत्रामध्ये गेले तीन ते चार दिवस चर्चेचा विषय बनली होती.या पोस्ट मुळे प्रसिद्ध भजनी बुवा म्हणून ख्याती असलेले विनोद चव्हाण यांची नाहक बदनामी झालेली असून त्यांच्या अब्रूचे नुकसान झाले आहे.तरी सदरील व्यक्तीवर योग्य ती कारवाही व्हावी अशी समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी बुवांच्या वातीने आज कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
प्रसंगी कणकवली तालुका भजन सांप्रदायिक संस्थेचे सचिव निलेश ठाकूर,कणकवली तालुका भजन सांप्रदायिक संस्थेचे संचालक शेखर चव्हाण,तसेच खजिनदार सुदर्शन फोपे,अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेश पांचाळ,कणकवली तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकूर आणि बुवा मयूर ठाकूर उपस्थित होते.
सदर प्रवृत्तीच्या विरोधात कारवाही होणे गरजेचे आहे,नाहीतर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत राहतील.त्यामुळे आपण योग्य ती कारवाही करा.अशा प्रकारच्या सूचना विनोद चव्हाण बुवा यांना कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे अध्यक्ष आणि अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाचे महामंडळ राज्यअध्यक्ष बुवा प्रकाश पारकर तसेच सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा गोपीनाथ लाड आणि अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बुवा संजय गावडे यांनी दिल्यानंतर सदरील तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली.

error: Content is protected !!