शेठ न.म.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे 11 एप्रिल 2025 रोजी महसूल विभागामार्फत शिबिर

विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक दाखले
कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ
शेठ न.म.विद्यालय व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी ठीक 8:00 वा ते दुपारी 2:00 वा. पर्यंत विद्यार्थ्यांना लागणारे विविध शैक्षणिक व प्रशासकीय दाखले काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शैक्षणिक दाखले एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी ठीक 8 वाजता कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे, मंडळ अधिकारी श्रीमती सरिता बावलेकर, ग्राम महसूल अधिकारी श्री प्रवीण लुडबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला प्रारंभ होईल.
पुढील शैक्षणिक वर्षी मुलांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते आणि आयत्यावेळी अनेक कागदपत्रे जमवणे
व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते सगळे कामकाज पूर्ण करणे सर्वच पालकांना शक्य होत नाही. पालकांचा तो त्रास वाचावा यासाठी खास या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी येताना सर्व पालकांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन शाळेत यावे असे आवाहन शेठ न.म. विद्यालय आणि जुनियर कॉलेज खारेपाटणचे प्राचार्य श्री संजय सानप यांनी केले. कणकवली तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. या संधीचा फायदा जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.