माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसा निमित्त कणकवलीत ठाकरे गटाला बसणार धक्का

ठाकरे गटातील काही आजी-माजी पदाधिकारी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संपर्कात
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीची भविष्यातील मोर्चेबांधणी सुरू
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या दोन दिवसात कणकवली शहरात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कणकवली नगरपंचायतची निवडणूक येत्या काळात होऊ घातली असून या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे. व त्याचाच एक भाग म्हणून खासदार नारायण राणे यांना वाढदिवसाच्या निमित्त पक्ष प्रवेशाचे गिफ्ट देण्याची तयारी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे काही आजी-माजी पदाधिकारी हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती उपलब्ध झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा 10 एप्रिल रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असतानाच या निमित्ताने भाजप पक्षप्रवेशाचे गिफ्ट देत समीर नलावडेंकडून ठाकरे गटाला धक्का देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या आजी, माजी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची ही माहिती खात्रीशीर सूत्रंकडून मिळाली आहे. कणकवली शहर हे राजकीय दृष्ट्या केंद्रबिंदू असताना या धक्का पॅटर्न मुळे आता कुणाला शह बसणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.