कणकवली व कलमठच्या पाणीटंचाई संदर्भात पालकमंत्र्यांच्या तात्काळ सूचना

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी वेधले लक्ष

शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात सोडण्याचे आदेश

उन्हाच्या झळा तीव्र होत असून यामुळे येत्या काळात संभाव्य पाणीटंचाई ची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेत कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले. तसेच कणकवली व कलमठ या दोन्ही गावांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहावा याकरिता शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी याची तात्काळ दाखल घेत या संदर्भात संबंधित विभागाला सूचना दिल्या असून, येत्या आठ दिवसात शिवडाव धरणाचे पाणी कणकवली गडनदीपात्रात दाखल होईल अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. दरम्यान कणकवली शहरालगत असलेल्या गडनदीपात्रात पाणी आल्यावर कणकवली नळ योजने सहित कलमठ मध्ये देखील कणकवली नगरपंचायत ची जी पाणीपुरवठा करणारी टाकी आहे त्या ठिकाणाहून कलमठ मधील भागाला पाणीपुरवठा सुरळीत करणे सोपे जाणार आहे. तसेच नदीपात्र कोरडे पडण्यापूर्वीच नदीपात्रात शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी केल्याने येत्या काळात कणकवली व कलमठ या दोन्ही भागांना पाणीटंचाईची झळ भासणार नाही व नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली.

error: Content is protected !!