खारेपाटण येथे जिवंत ७/१२ मोहीमे अंतर्गत चावडी वाचन उपक्रम संपन्न …..

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या दि.१९ /३/२०२५ च्या शासन निर्णयानुसार आपल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील मयत व्यक्तींची नावे कमी करून त्यांच्या जागी त्यांच्या वारसांची नावे लावण्याच्या उद्देशाने कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात नुकताच जिवंत ७/१२ मोहीम अंतर्गत चावडी वाचनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
या कार्यक्रमाला उपसरपंच श्री महेंद्र गुरव,ग्रा.पं.सदस्य श्री जयदीप देसाई,सौ शीतिजा धुमाळे, दक्षता सुतार,मानली होनाळे, खारेपाटण संभाजीनगर पोलीस पाटील श्री भिकाजी चव्हाण, खारेपाटण शिवाजीपेठ पोलीस पाटील श्री अनिकेत जामसंडेकर, चिंचवली गाव पोलीस पाटील श्री दिगंबर भालेकर,खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर,श्री महेश कोळसुळकर,माजी पोलीस पाटील बाळा शेट्ये,प्रकाश मोहीरे,शंकर राऊत,शमशुद्दिन काझी,लवू चव्हाण,निखिल गुरव,ग्राम विकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर, खारेपाटण मंडल अधिकारी श्रीम. सरिता बावलेकर,ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी श्री प्रवीण लुडबे,कोतवाल प्रथमेश गुरसाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या चावडी वाचन कार्यक्रमास खारेपाटण,शिवाजीपेठ,संभाजी नगर आणि काजिर्डे आदी चार महसुली गावातील सातबारा खातेदारांची नावे व त्यातील मयत व्यक्तींची नावे तलाठी श्री प्रवीण लुडबे यांनी चावडी वाचनात ग्रामस्थांना वाचून दाखवली.तसेच शासनाच्या जिवंत ७/२२ मोहीमचा उद्देश स्पष्ट केला.तर यावेळी मंडल अधिकारी श्रीम.बावलेकर यांनी देखील चावडी वाचन करून मयत व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी व वारसांची नावे लावण्यासाठी हा शासनाने उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी देखील उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून शासन राबवित असलेली जिवंत ७/१२ मोहीम का ? आवश्यक आहे.हे सांगितले.तर नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या सात बारा वरील मयत व्यक्तीची नावे कमी करून आपल्या वारसांची नावे लावून घ्यावीत असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री जी सी वेंगुर्लेकर यांनी केले.तर तलाठी प्रवीण लुडबे यांनी ग्रामस्थांना ७/१२ विषयी माहिती दिली.यावेळी घेण्यात आलेल्या चावडी वाचन कार्यक्रमास मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थिती होते.

error: Content is protected !!