बंद बस फे-या पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वेधले मालवण आगार प्रमुखांचे लक्ष

आचरा येथून सकाळीकोल्हापूर येथे जाणारी बस फेरी बऱ्याच वर्षापासून बंद असून व्यापारी वर्गाला कोल्हापूर येथे प्रवास करणे अवघड होत आहे त्यामुळे आचरा कोल्हापूर ही बस फेरी पुन्हा सुरू करावी तसेच आचरा बोरीवली कणकवली एसटी डेपो ची गाडी बंद झाल्याने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी आचरा बोरीवली बस या दोन्ही गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी निवेदनाद्वारे मालवण आगार प्रमुख अनिरुद्ध सुर्यवंशी यांच्याकडे केली आहे यावेळी तालुकाप्रमुख महेश राणे,,दीपक पाटकर,जयप्रकाश परुळेकर,मनोज हडकर,अजित घाडी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर आदी उपस्थित होते.