“रंगोत्सव सेलिब्रेशन”मध्ये आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या विद्यार्थ्यांचे यश.

कणकवली/मयूर ठाकूर

दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या रंगोत्सव स्पर्धेत रंगभरण, हस्ताक्षर, कोलाज, कार्टून मेकिंग, टॅटू मेकिंग, फिंगर अँड थम पेंटिंग अशा विविध प्रकारात ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.

यामध्ये , पूर्वा तेली( 9th ) हिने फिंगर आणि थम या प्रकारात, हितिका नारकर (4th) रंगभरण, संनिधी उचले (2 nd )मास्क मेकिंग, सम्राट निकम (7th) हस्ताक्षर, मैत्रेय कदम( 4th )कार्टून मेकिंग या प्रकारात विशेष प्रविण्या प्राप्त केले. तर इतर विध्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!