अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी योगेश पांचाळ यांची निवड.

बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले विद्यमान विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण ठाकूर कणकवली चे नूतन तालुका अध्यक्ष.
कणकवली/प्रतिनिधी
अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ या संस्थेची सभा मुंबई भांडुप येथे सह्याद्री विद्यालयात नुकतीच संपन्न झाली.या बैठकी प्रसंगी राज्यभरातील नामवंत भजनी बुवा,भजन क्षेत्रातील संबंधित सर्व कलाकार उपस्थित होते.भजनी बुवांच्या हितासाठी आरोग्य विमा तसेच विविध योजना राबविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकणारी ही संस्था आणि या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचे सुपुत्र जिल्ह्यातील प्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा योगेश पांचाळ यांची निवड झाली आहे.तसेच बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे कणकवली तालुक्यामधून पाहिले जाते असे आशिया गावचे सुपुत्र आणि गावचे माजी उपसरपंच,आणि विद्यमान विशेष कार्यकारी अधिकारी तसेच उद्योजक प्रवीण ठाकूर यांची कणकवली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.ही निवड बैठकीदरम्यान एकमताने झालेली असून त्यांना नियुक्तीपत्र-ओळखपत्र तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार तसेच सन्मान भांडुप येथील कार्यक्रमात करण्यात आला.हा कार्यक्रम संपन्न होत असते वेळी संपूर्ण राज्यभरातून वारकरी सांप्रदायातील तसेच भजनी सांप्रदायातील भजनी बुवा,कोरस,पखवाज वादक तसेच इतर सर्व मंडळी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये मालवण तालुका अध्यक्ष म्हणून बुवा राहुल कुलकर्णी यांना देखील तालुका अध्यक्ष पद सुपूर्त करण्यात आले.सन्माननीय या संस्थेचे संस्थापक संजयजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेल कार्य आम्ही करू आणि तळागाळातील भजनी बुवा गोरगरीब कलाकार यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू असे आश्वासन योगेश पांचाळ आणि प्रवीण ठाकूर यांनी दिले.