कणकवली शहरातील महामार्गावरील तब्बल 36 हून अधिक पथदिवे बंद

महामार्ग प्राधिकरण चा भोंगळ कारभार अजूनही सुधारेना

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी वेधले उप अभियंत्यांचे लक्ष

कणकवली शहरातील महामार्ग प्राधिकरणाने लावलेले तब्बल 36 हून अधिक पथदिवे बंद असून गेले अनेक दिवस महामार्गावर काळोखाचे वातावरण आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयापासून प्रमुख भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर काळोखाचे वातावरण असते. याबाबत तात्काळ उपायोजना करा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिला आहे. कणकवली शहरातील गड नदी ब्रिज ते जानवली पर्यंतचे पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या सत्रात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरण चे उप अभियंता यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही याबाबत कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नसल्याने महामार्ग प्राधिकार्‍यांच्या या अनागोंदी कारभाराच्या विरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!