वायंगणी येथील विकास कामांची उद्घाटने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते संपन्न

वायंगणी येथील खांबलवाडी ते सडयेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण,घाडीवाडी ते तोंडवळीफाटा रस्ता खडीकरण डांबरीकरण, वायंगणी ग्रामपंचायत येथे पेवरब्लाक बसवणे,घाडीवाडी येथील स्मशानशेड बांधणे आदी विकास कामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मालवण तालुका शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,आचरा सरपंच जेरान फर्नांडिस,दिपक पाटकर, डॉ प्रमोद कोळंबकर,सदा राणे,मनोज हडकर, जयप्रकाश परुळेकर, संतोष मिराशी, निलेश खोत,तात्या दुखंडेसंजय सावंत .विलास सावंत,यांसह अन्य मान्यवर, वायंगणी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.