अॅड. मेघना सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती

भिरवंडे गावच्या सुकन्या आणि कणकवलीतील प्रतिथयश वकील मेघना देवू सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. मेघना सावंत या गेल्या 19 वर्षाहून अधिक काळ कणकवलीत वकील म्हणून कार्यरत आहेत. कणकवली तसेच जिल्हा न्यायालयात त्यांनी आपला वकीली व्यवसाय केला आहे. नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. मेघना सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.