अबू आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा!

कणकवली सकल हिंदू समाजाची निवेदनाव्दारे मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशना नंतर विधानसभा आवारात, प्रसार माध्यमांशी बोलताना औरंगजेब बादशाह उत्तम शासक होता. तो क्रूर नव्हता असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी केले होते. हे विधान सामाजिक समरसता बिघडवणारे आहे. तरी त्यांचे विधानसभा सदस्यत्व कायमचे रद्द व्हावे,व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल हिंदू समाज कणकवली यांच्या वतीने आज तहसीलदार कणकवली यांना निवेदन देत मागणी करण्यात आली आहे. त्याच्या प्रत माहितीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कणकवली
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कणकवली यांना देण्यात आले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, प्रदीप हरमलकर, राजू तांबे, कृष्णा वायंगणकर, हेमंत वायंगणकर ,शुभंम देसाई , कमलाकर पाटील, श्रीराम मोरजकर, मारुती मोरये,संदीप पाटील, अनंत परब , बापू पोकळे, तुषार कुडतरकर , प्रकाश खरात आदी हिंदू बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!