दिविजा वृद्धाश्रमात महिला दिन उत्साहात साजरा

दिविजा वृद्धाश्रम ही गरीब व गरजवंत आजी आजोबांना उपचारात्मक पुनर्वसनाचे कार्य करत आहे.हे कार्य करत असतानाच ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांकरिता दंतकिय चिकित्सा करण्याचे काम मोफत करत आहे.त्याच बरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या संस्थानाही मदतीचा हातभार लावते. यावर्षी ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून दिविजा वृद्धाश्रमाने कौटुंबिक कुटुंब सांभाळून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार केला.या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री सुर्यकांत तळेकर यांच्या हस्ते या महिलांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये यांनी सामाजिक बांधिलकी जोपनाऱ्या महिलांच्या कामाचे कौतुक करण्याकरिता व त्यांना काम करत असताना नवीन प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. १)डॉ हेमा तायशेटे-(भूलतज्ञ कणकवली)डॉ विद्याधर तायशेटे यांची पत्नी डॉ हेमा तायशेटे ज्या सरकारी रुग्णालयात तसेच कणकवलीतील काही रुग्णालयात भूलतज्ञेचे काम सांभाळत आहेत गरीबातील गरीब रुग्णांना मोफत उपचार करण्याचे काम डॉ तायशेटे कुटुंब आज कित्येक वर्ष करत आहेत त्यांच्या या कार्याचा गुणगौरव करण्याचा निर्णय दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला. २)डॉ किमया वानखेडे या विवेकानंद नेत्र चीकीत्सलयात मोतीबिंदूची ऑपरेशन करण्याचे काम डॉ किमया करत आहे.गरीब व गरजू रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनात प्रकाश देण्याचे कार्य डॉ किमया दिवसरात्र करीत आहेत.त्यांच्या या कार्याचे गुणगौरव करण्याचे दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला. ३)सौ रिया संगेलकर ( महिला समुपदेशक महिला व बालक विशेष सहायत्ता कक्ष ) महिला समुपदेशक केंद्र पोलीस स्टेशन आवार कणकवली महिला व बालविकासाची कामे या मॅडम सतत करत असतात.महिला व बालकांना समुपदेशक करण्याचे मोठे कार्य या मॅडम करत आहेत.या समुपदेशक हि काळाची मोठी गरज आहे अशा या व्यक्तिमत्वाच्या दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या शुभशिर्वादाने यांचा सत्कार करण्यात येत आहे. ४) सौ रोजा खडपकर (महिला समुपदेशक महिला व बालक विशेष सहायत्ता कक्ष )महिला समुपदेशक केंद्र पोलीस स्टेशन आवार कणकवली महिला व बालविकासाची कामे या मॅडम सतत करत असतात.महिला व बालकांना समुपदेशक करण्याचे मोठे कार्य या मॅडम करत आहेत.या समुपदेशक हि काळाची मोठी गरज आहे अशा या व्यक्तिमत्वाच्या दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या शुभशिर्वादाने यांचा सत्कार करण्यात येत आहे. ५) कु अस्मिता गिडाळे(पत्रकार)समाजातील ताज्या घडामोडी आपल्या पर्यंत आणण्याचे काम पत्रकार कु अस्मिता गिडाळे या सतत काम करत आहेत.त्यांचे आज त्यांच्या या कामामुळे कुठे काय घडते हे सहजपणे कळत आहे.त्यांच्या या कार्याचा गुणगौरव करण्याचा निर्णय दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला. ६) श्रीम प्रणाली कदम ( CHO ) ओटव असलदे या गावात घराघरात जाऊन लोकांच्या आरोग्य सेवा जाणून त्यांना औषधोपचार पुरवणे व लोकांची वैद्यकीय समस्या सरकारी मध्यमापर्यंत पोहचवणे हे मुख्य काम करत आहेत.करोना सारख्या महामारीमध्ये स्वतःचा विचार न करता प्रणाली मॅडम लोकांपर्यंत पोहचून त्यांची उत्तमप्रकारे सेवा करत होत्या तसेच आजही त्या सेवा पुरवत आहेत त्यांच्या या कार्याचा गुणगौरव करण्याचे दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला ७) सौ समिक्षा वायंगणकर या आरोग्य विभागात परिचारिकेचे काम सांभाळत आहेत.तळागाळाच्या गोर-गरीब लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या आरोग्य विषयक समस्या व त्यांचे औषधोपचार पुरवण्याचे काम समीक्षा मॅडम करत आहेत.करोनाच्या महामारीच्या काळात स्वतःचा विचार न करता लोकांसमोर जाऊन त्यांचे मनोधैर्य वाढवून मोठ्या उत्साहाने करत होत्या.दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांशी सतत संवाद साधून त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी सतत हजर असणाऱ्या समिक्षा मॅडम यांच्या या कार्याचा गुणगौरव करण्याचे दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला ८ )श्रीम भाग्यश्री नरे ( असलदे गावच्या आशासेविका) श्रीम भाग्यश्री नरे या आरोग्य विभागात आशा म्हणून असलदे या गावी सेवा करत आहेत.गावातील गोरगरीब लोकांकरिता मोफत वैद्यकीय मुलभूत सुविधा देण्याचे काम सतत करत आहेत करोनाच्या काळातही लोकांच्या घरोघरी जाऊन मोठ्या जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली.त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून गुणगौरव करण्याचे दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला ९) सौ सावित्री पाताडे ( पोलीस पाटील असलदे )असलदे गावच्या पोलीस पाटील सौ सावित्री पाताडे यांचा सामाजिक कार्यात उस्पुर्तपणे काम करत आहेत.गावातील लोकांच्या मदतीला सतत धावून जाणाऱ्या महिला पोलीस पाटील यांच्या या कार्याला गुणगौरव करण्याचे दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला . १०) सौ सानिका तांबे ( CRP ) असलदे गावच्या सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटातील CRP म्हणून काम करण्याऱ्या सौ सानिका तांबे यांचा महिला दिनानिमित्त इथे विशेष पुरस्कार आम्ही करीत आहोत.आपल्या अपंगत्वावर मात करून गोर गरीब जनतेच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सौ सानिका मॅडम यांचा गुणगौरव करण्याचे दिविजा वृद्धाश्रमाने महिला दिनाचे औचित्य साधून करण्याचा ठरविला.
या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा दिविजा वृद्धाश्रम मार्फत सत्कार करण्यात आला तर संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये यांनी आश्रमातील सर्व महिला कर्मचारी यांचा त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचाही सत्कार केला गेला.या प्रसंगी आश्रमातील सर्वात सिनियर महिला कर्मचारी सौ प्रतीक्षा सावंत, सौ अनुजा आचरेकर,सौ मंजिरी राणे,सौ सारिका सावंत,सौ अर्चना इंदप,श्रीम प्रमिला शेलार,सौ सानिया इंदप,श्रीम भारती गुरव,सौ अमृता इंदप,सौ अस्मि राणे,कु सायली तांबे,कु अश्विनी पटकारे,कु ऋतुजा इंदप यांचाही शाल श्रीफळ व गौरव चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी सत्कार आणि पुरस्कारीत केलेल्या सर्व मान्यवर महिलांना भरभरून आशीर्वाद दिले.कार्यक्रमात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री अरविंद राणे व त्यांच्या पत्नीने गाण्याचा कार्यक्रम सादर करून सर्व वातावरण मंत्रमुग्ध केले.सत्कार प्रसंगी बोलताना सर्व मान्यवरांनी आपण केलेल्या कामाचे कौतुक केल्यामुळे आपणास आणखी एक नवीन उर्जा मिळाली आहे व जे काम करत आहोत ते आणखी उत्साहाने आणि काळजीने करू असे सांगितले. अशा प्रकारे सर्वांचे आभार मानून शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!