मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक सुरेश गोलतकर यांचे निधन

मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवकसुरेश शांताराम गोलतकर रा.चिंदर सडेवाडी यांचे मंगळवारी मुंबई येथे दुःखद निधन झाले. सुप्रसिद्ध रगावलीकार, तैलचित्र कार, नेपथ्यकार म्हणूनही ते सुप्रसिद्ध होते.
त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य बाजार – उद्यान समिती सदस्य म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी सुन जावई असा परिवार आहे.चिंदर सडेवाडी माऊली रिसॉर्ट चे मालक आणि सुप्रसिद्ध रगावलीकार विशाल गोलतकर यांचे ते वडील होत.