विभाग आणि राज्यस्तरावर कु.यश पवार आणि कु. दुर्वा सरूडकर चमकले.

राजापूर येथे “राजापूर रॉयल चेस अकॅडमी” तर्फे घेण्यात आलेल्या विभाग स्तरीय रॅपिड चेस स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेचा कु.यश देऊ पवार (इयत्ता आठवी) याने प्रथम येण्याचा मान मिळवला. 130 स्पर्धक या गटात सहभागी झाले होते.त्याचप्रमाणे देवगड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ची कु दुर्वा दिलीप सरुडकर (इयत्ता सातवी ) हिने 14 वर्षाखालील आणि 47 kg वजनी गटात पहिली येण्याचा बहुमान मिळवला, आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!