“श्यामची आई”संस्कार परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कुल वरवडे चे यश.

कणकवली/प्रतिनिधी

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूज्य सानेगुरुजींच्या “श्यामची आई” या संस्कारक्षम कादंबरीवर घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
सानेगुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त यावर्षी प्रशालेतील इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी सुमारे 200 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, यामधून प्रत्येक वर्गातून प्रथम 3 क्रमांक काढण्यात आले,सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!