खारेपाटण शुक नदीत बुडालेला दिगंबर वाळकेचा मृतदेह अखेर आज सापडला

खारेपाटण येथील शुकनदीत बुधवार दी.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी कुडाळ, पिंगुळी येथील दिगंबर प्रकाश वाळके( वय – 28 )हा नदी पात्रात बुडालेला युवक अखेर आज शुक्रवार दी.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी नदी पात्रात सकाळी ८.३० वाजता मृत अवस्थेत आढळून आला.असल्याची माहिती खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी.माने यांनी दिली.
याबाबत अधिक वृत्त असे की मयत दिगंबर वाळके हा आपल्या मित्रा सोबत खारेपाटण शुक नदी येथे दीं.२६ फेब्रुवारी सायंकाळी आला होता.व खारेपाटण शुक नदीत आंघोळ करण्यासाठी गेला असता तो पाण्यात सायंकाळी ४.०० च्या दरम्यान बुडाला असल्याची माहिती त्याचा मित्र राहुल महादेव वाघ राहणार कर्जत,अहमदनगर यांनी पोलिसांना दिली होती.तर सद्या मित्र राहुल वाघ याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने गेले दोन दिवस शोध मोहीम खारेपाटण शुक नदीत करण्यात आली होती.मात्र बुडालेला युवक सापडलेला नव्हता.
दरम्यान शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्पीड बोटचा वापर करून नदी पात्रात शोध m काढले.तसेच मालवण येथील स्कुबा डायव्हींगची टीम याना देखील गुरुवारी सायंकाळी खारेपाटण येथे बोलवण्यात आले होते.यामध्ये वैभव खोबरेकर,नुपूर तारी,सूजित मोंडकर,स्वप्नील धुरी,समीर गावकर यांचा स्कुबा डायव्हिंग पथकात समावेश होता.मात्र त्यांना देखील बुडालेला युवक आढळून आलेला नाही.अखेर आज शुक्रवारी ८.३० च्या खारेपाटण शुक नदी येथील कोंडवाडी धारणा जवळील नदी पात्रात नदीत आढळून आला. खारेपाटण दुरशेत्राचे पोलीस अधिकारी श्री माने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ओळख पटवून नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतला. तर पुढील शवविचेदन कार्यवाही साठी मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवीन्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.व शवविचेदन नंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणार येणार असल्याचे समजते.याबाबत आधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे अधिकारी श्री माने व श्री मोहिते करत आहेत.

error: Content is protected !!