युवा सेना तालुकाप्रमुखांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर दारिस्ते रस्त्याचे काम सुरू

आठ दिवसात कामाची डागडुजी न केल्यास आंदोलनाचा दिला होता इशारा

कणकवली तालुक्यातील दारिस्ते येथील ग्रा. मा. ४२९ या रस्त्यावर आपल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत माजी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीमुसार मंजुर झालेल्या रस्त्यावर सध्या काम चालू आहे. या कामात ज्या मोऱ्या बांधलेल्या आहेत त्यांना मजबुतीकरण केलेले नसून त्याचा पाया हा निकृष्ट स्वरुपाचा बांधलेला आहे. तसेच त्या मोठ्या अपघातास कारणीभूत ठरतील अशा स्वरुपाच्या बांधल्या गेल्या आहेत. याबाबतची तक्रार युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी केली होती. या तक्रारीनंतर या कामाची डागडुजी आता हाती घेण्यात आली आहे अशी माहिती उत्तम लोके यांनी दिली. या निकृष्ट कामाबाबत तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा लोके यांनी दिला होता त्यानंतर खडबडून जागी झालेल्या प्रशासनाकडून याची दखल घेत आता कामाची डागडुजी करत काम सुरू करण्यात आले आहे.

error: Content is protected !!