कणकवली मधील दुकानांचे फलक मराठीत लावण्या बाबत अंमलबजावणी करा!

मनसे ची मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे मागणी

मराठी राजभाषा दिनानिमित्त कणकवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली शहराध्यक्ष योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी पाटील यांची भेट घेऊन कणकवली शहरातील काही दुकाने व आस्थापना यांचे फलक नगरपंचायत प्रशासनाने नोटीस देऊनही बदलले नाहीत त्याबद्दल निवेदन व चर्चा करून लक्ष वेधले.तसेच कणकवली शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत मुख्यधिकारी पाटील यांना सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुका सचिव श्री.संतोष कुडाळकर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली शहराध्यक्ष श्री.योगेश कदम व मनसैनिक श्री.श्रीकांत सादये हे उपस्थित होते.

error: Content is protected !!