सावंतवाडी मधील “त्या” महिलेचा खून करून मृतदेह ओसरगाव मध्ये जाळल्याचे स्पष्ट

संशयित आरोपी वेतोरीन फर्नांडिस च्या मुसक्या एलसीबी ने आवळल्या
कणकवली पोलिसांसह एलसीबीची कौतुकास्पद कारवाई
आरोपीने कर्जबाजारीपणातून महिलेचा खून केल्याचा प्राथमिक निष्कर्ष
कणकवली तालुक्यामध्ये ओसरगाव येथील अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरची वाडी येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या सौ. सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) हिचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर महिलाही अंगणवाडी सेविका होती असेही स्पष्ट झाले आहे. मयत महिलेच्या मुलीने घटनास्थळी सापडलेले दागिने व अन्य साहित्य ओळखले असून त्यानुसार मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच तिचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह ओसरगाव येथे आनत जाळण्यात आला. याप्रकरणी संशयी आरोपी वेतोरिन रुजाय फर्नांडिस रा. वेंगुर्ला, आरवली (वय ४५) याला त्याच्या घराकडून गुरुवारी रात्री अटक करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली अशी माहिती कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह सापडल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस या गुन्ह्याच्या तपासासाठी सक्रिय झाले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग तसेच कणकवली पोलीस या पथकांच्या माध्यमातून या संशयित आरोपीच्या मागावर होते रात्रंदिवस या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी पर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. महिलेची ओळख पटल्यानंतर आरोपी पर्यंत पोहोचणे पोलिसांना सोपे झाले. या खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच संशयित आरोपीने या महिलेचा खून केला व तिला ओसरगाव येथे आणून तिला जाळण्यात आले. तत्पूर्वी संशयित आरोपी हा ईरटीका कार ने महिलेसह कोल्हापूर येथे गेला होता. कोल्हापूर येथे त्या महिलेने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपये घेतले होते. तिथे पर्यंत एलसीबी चे पथक पोहोचत तेथील पाळेमुळे शोधण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास करताना कोल्हापूर येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या पथकाने कसून तपास केला. या ठिकाणी एका सीसीटीव्ही मध्ये सदर महिला व संशयित आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आला. ती माहिती स्थानिक पोलिसांकडे पाठवून चारी बाजूने संशयाचा मुसक्या आवळण्यात आल्या. या महिलेने कोल्हापूर येथे जाताना आपल्या सोबत आपल्या जावेचे काही दागिने घेऊन गेली होती अशी ही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तर संशयीत आरोपी कर्जबाजारी होता असे देखील पोलिसांनी सांगितले आहे. रात्री पोलिसांनी संशयित आरोपीच्या घरी आरोपीला अटक करण्यासाठी छापा टाकला असता सुरुवातीला आरोपीने हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवतात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस सूत्रानी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलिसांच्या टीमने या प्रकरणी कसून तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला. दरम्यान मृतदेह सापडला त्या पूर्वी या स्थळाच्या आसपास ईरटीका कार चा असलेला वावर व तीच ईरटीका कोल्हापूर येथे ट्रेस झाल्याने हे महत्त्वाचे पुरावे हा गुन्हा उघडकीस करण्यास महत्त्वपूर्ण ठरले. दरम्यान त्या महिलेचा डीएनए रिपोर्ट पाठवण्यात आला असून तो देखील लवकर प्राप्त होईल असे सांगण्यात आले. मृतदेह जळालेल्या स्थितीत मिळाल्यापासून अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यास यश आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कणकवली पोलीस यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.