हस्ताक्षर स्पर्धेत हर्षदा सुतार प्रथम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कणकवली नगर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आल्या स्पर्धा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कणकवली नगर वाचनालयाच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात हर्षदा राजू सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय दिया महेश मेस्त्री तर गुलजार आरीफी सिद्धीकडे तृतीय क्रमांक प्राप्त केला. उत्तेजनार्थ राजरत्न सुभाष जाधव याने पारितोषिक पटकाविले. २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वितेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सह कार्यवाह डी. पी. तानवडे, प्राजक्ता सावंत यांच्यासह नगर वाचनालयातील कर्मचारी, विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जि. प. शाळा नंबर २ च्या विद्यार्थ्यांनी वाचनालयात भेट दिली.

error: Content is protected !!