ओढ श्री देव रामेश्वर कुणकेश्वर शाही भेटीची ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे आचरा वासिय उत्सुक

संस्थान आचरे गावचा राजा इनामदार श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात असंख्य रयतेसह बुधवारी महाशिवरात्रीला श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळाला 39 वर्षांनी भेटीसाठी रवाना होणार आहे.या अलौकिक आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघ्या आचरा वासियांसोबत जिल्ह्यावासिय उत्सुक झाले आहेत. हा सोहळा अनुभवण्यासाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात येण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.यादृष्टीनेच गेले काही दिवस श्रींची स्वारी जाण्याच्या पारंपरिक वाटांच्या स्वच्छतेसाठी देवस्थान समिती बारापाच मानकरयांच्या पुढाकाराने संपूर्ण आचरावासियांसोबत संबंधित भागातील ग्रामस्थ हिरहिरीने झटत आहेत.
या शाही भेटी सोबत जामसंडे दिर्बा माऊली आणि रामेश्वर भेटीचा सोहळाही संपन्न होणार आहे. या मुळेऐतिहासिक क्षणाची आतुरता वाढली आहे. देव स्वारी सोबत जाणारया भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थान तर्फे पिण्याच्या पाण्याची ,अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी भाविकांतर्फेही अल्पोपहार, जेवण व्यवस्था केल्याचे समजते.महिलांसाठी प्रसाधन गृहे,तसेच कचरा नियोजनासाठी कचरा कुंड्या ही उभारण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य पथकही तैनात असल्याची माहिती देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी यांनी दिली आहे.
याबाबत देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप गोपाळराव प्रभू मिराशी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आचरे गावचे सर्वा इनामदार श्री देव रामेश्वर कसबा आचरे यांच्या कौल प्रसादाने दक्षिण कोकणची काशी मानले जाणाऱ्या स्वयंभू श्री देव कुणकेश्वर महास्थळास इनामदार श्री देव रामेश्वर आचरे हे जवळपास 39 वर्षानंतर आपल्या प्रथा परंपरा पूर्व रुढीप्रमाणे संपूर्ण आपला लवाजमा तथा सर्व सरंजामशाही राजेशाही थाटाने महाशिवरात्र दिनी २६ फेब्रुवारी रोजी जाणार आहेत. यामुळे आचरे व कुणकेश्वर पंचक्रोशीतील सर्व मानकरी चाकर नोकर व ग्रामस्थ उत्साहाने शाही भेटीत आपला खारीचा वाटा उचलावा या हेतूने अंदाजे १४ते१५ किलोमीटर पर्यंतचा मार्ग व्यवस्थित साफसफाई करण्यासाठी योगदान देत आहेत. सदर उत्सवासाठी संपूर्ण आचरे गावातील ग्रामस्थ, देवसेवक समाजसेवी संस्था
मान्यवर मंडळी यांनी आपापल्या परीने स्वेच्छेने योगदान देत आहेत. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यासाची विश्वस्त मंडळी सदर पवित्र कार्याचे आदर्शवत नियोजन करून वाडीवार मंडळांना तसेच देव स्वारींबरोबर जाणाऱ्या रयतेकडून चालताना होणाऱ्या कचऱ्याचे योग्य ते नियोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.
या पवित्र सोहळ्यात सर्वांनी शांततापूर्वक योग्य ते सहकार्य करून योगदान देण्याचे आवाहन बारा पाच मानकरी श्री देव रामेश्वर आचरा व देवस्थान समिती कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!