खारेपाटण येथे शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

शिवजयंती उत्सव समिती तथा किल्ले खारेपाटण संवर्धन समिती, ग्रामपंचायत खारेपाटण व श्री कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट यांचे आयोजन
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती उत्सव समिती तथा किल्ले खारेपाटण संवर्धन समिती, ग्रामपंचायत खारेपाटण व श्री कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने खारेपाटण शहरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सिंधुदुर्ग डॉक्टर्स फ्रॅटरनिटी क्लब, डॉक्टर्स फ्रायडे क्लब, टीव्हीके ग्रुप व रांगणा रनर्स-रागिनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध डॉक्टर्स संघटनांच्या वतीने शिवपथ मोहीम घेण्यात आली, रात्री 9 वाजता कणकवली येथून सुरू होऊन पहाटे 6 वाजता खारेपाटण शिवपदयात्रा मोहीमेचे आयोजन करण्यात आले… त्यांचे किल्ले खारेपाटण संवर्धन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यामध्ये जवळपास 150 डॉक्टर्स आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते.
केंद्र शाळा खारेपाटण नंबर 1 येथे या संघटनेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले,
यावेळी किल्ले खारेपाटण संवर्धन समितीचे श्री मंगेश गुरव, श्री. ऋषिकेश जाधव यांनी खारेपाटण किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. सर्व डॉक्टर्स व आयोजकांचे या शिवपद मोहिमेत सहभागी सर्वांचे कौतुक करत मेडल देण्यात आले. खारेपाटण किल्ले संवर्धन समिती ने या मोहिमेला खारेपाटण ची निवड केल्या बद्दल समितीच्या वतीने DFC चे डॉ राजेंद्र पाताडे. व रांगणा ग्रुप चे डॉ श्री रावराणे, तसेच खारेपाटण येथील सुप्रसिद्ध डॉ प्रसाद मलांडकर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व सर्वांचे आभार श्री मंगेश गुरव यांनी मानले.
शिवजयंती उत्सव निमित्त
सकाळी ठीक 9:00 वाजता एसटी स्टँड खारेपाटण ते किल्ले खारेपाटण शिवछत्रपतींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर किल्ले खारेपाटण येथे दुर्गादेवीला श्रीफळ अर्पण करून पाच शिवकन्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन करून महाराजांना मानवंदना देण्यात आली.
किल्ल्यावर भगवे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवजयंती औचित्य साधून खारेपाटण गावातील सर्व शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळी किल्ले जयगड ये किल्ले खारेपाटण अशी पायी दौड करत शिवाज्योत आणणाऱ्या तरुणांचा स्टकर करण्यात आला.
या कार्यक्रमाला सरपंच सौ.प्राची इसवलकर, उपसरपंच श्री महेंद्र गुरव, सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे सुधाकर ढेकणे क्षितिजा धुमाळे, सुतार, व्यापारी असो अध्यक्ष श्री चेतन हुले, श्री कालभैरव ट्रस्ट चे प्रवीण लोकरे, नंदू कोरगावकर, विजय देसाई, मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते महेश कोलासुलाकर,रिक्षा संघटनेचे सदस्य, बचतगट सदस्य, crp, यांच्या सह खारेपाटण जी. प केंद्र शाळेचे विद्यार्थी, ढोलपथक, खारेपाटण हायस्कूलचे लेझीम पथक, खारेपाटण सीनियर कॉलेजचे एनसीसी पथक तसेच विविध संस्थांचे व मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.