शेठ.न.म.विद्यालय खारेपाटणच्या 71 व्या एस.एस.सी बॅचचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण येथील शेठ न म विद्यालयाच्या 71 व्या एसएससी बॅचचा शुभेच्छा समारंभ प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नासिरभाई काझी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे,सचिव महेश कोळसुलकर,विश्वस्त विजय देसाई,गुरु शिंदे,सीनियर कॉलेजचे प्राचार्य तथा विश्वस्त डॉक्टर एडी कांबळे, यश कॉम्प्युटर चे संचालक मंगेश गुरव,मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात कुमारी प्राजक्ता ठाकूरदेसाई हिने दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील आठवणींना उजाळा देत सर्व शिक्षक व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व विद्यालयाला एक डिजिटल घड्याळ भेट स्वरूपात दिले.त्यानंतर वर्गशिक्षिका सौ कोकाटे ,सौ भोर,राजेश वारंगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नासिरभाई काझी यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने दहावीच्या परीक्षेला सामोरे जात गुणवत्तापूर्वक निकालाचे प्रदर्शन करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा,असे आवाहन केले.. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी सुद्धा आपल्या विद्यालयाच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत कोणतेही दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे,असे आवाहन केले.. मुख्याध्यापक संजय सानप म्हणाले,विद्यालयातील सर्व शिक्षकांनी आपल्यासाठी मेहनत घेतली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही पण चांगली अभ्यासाची तयारी केली आहे,त्याचा एकत्र मेळ घालत शाळेच्या निकालाची उंची वाढवावी व आयुष्यात यशस्वी व्हावे असे उद्गार काढले. प्रास्ताविक पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी केले. सूत्रसंचालन श्री महादेव मोटे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय सानप यांनी मानले.